नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या अधिनस्त कार्यालयात अर्थात पदुम विभागात एकूण मंजूर पदे १० हजार ८७० आहे. यातील ७८५ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ४७१ आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले ३८८ आहे.
अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी , कर्मचाऱ्यांची संख्या ८१ आहे.तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या ६० दाखविण्यात आलेली आहे.माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी ही माहिती मागितलेली आहे.
पशुसंवर्धन विभागात एकूण मंजूर पदे ५ हजार ९९० आहे.यात अनुसूचित जमातीची राखीव पदे ४१९ आहे.यापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या २६५ आहे. अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या २३९ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्यांची संख्या २६ आहे. रिक्त पदे २६ दाखविले आहे.
दुग्धव्यवसाय विभागात एकूण मंजूर पदे ३ हजार ९५७ आहे.यापैकी अनुसूचित जमातीची राखीव पदे ३१३ आहे. त्यापैकी भरलेल्या पदांची संख्या १५९ आहे.जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या ११२ असून अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेल्यांची संख्या ४७ आहे.रिक्त पदे २७ दाखविलेली आहे.
मत्स्यव्यवसाय विकास विभागात एकूण मंजूर पदे ९२३ आहे.त्यापैकी अनुसूचित जमातीची राखीव पदे ५३ आहे.भरलेल्या पदांची संख्या ४७ आहे. जातवैधता सादर केलेल्यांची संख्या ३७ तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेली ८ पदे आहे.रिक्त झालेली पदे ७ दाखवण्यात आली आहे.
अनुसूचित जमातीच्या बिंदूवर असलेल्या एकूण ८१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यानंतर ८१ जागा रिक्त असायला पाहिजे.परंतू केवळ ६० जागाच रिक्त केल्यात. २१ पदे कुठे गायब झाली ? आमची राखीव पदे आम्हाला मिळावी. या पदांची जाहिरात काढून विशेष पदभरती मोहीम राबविण्यात यावी.
— नितीन तडवी,जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम नंदुरबार.