नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटेनची जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदाची निवड ही मतदान घेवून करण्यात आली असून यात प्रविण चव्हाण यांना १४ मते मिळाल्याने त्यांची निवड झाली तर उर्वरीत कार्यकारिणी बिनविरोध करण्यात आली.
यावेळी नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज चौधरी, मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची बैठक दि.२८ डिसेंबर रोजी नेहरू चौकातील पत्रकार भवनात घेण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी प्रविण चव्हाण, उपाध्यक्षपदी सुभाष राजपूत, कार्याध्यक्षपदी महेंद्र चौधरी तर सचिवपदी सुबोध अहिरे, सहसचिवपदी अजिम हाशमी, प्रसिध्दी प्रमुखपदी हिरालाल मराठे, सदस्यपदी जितेंद्र जाधव, देविसिंग राजपूत, दिलीप बडगुजर, मनोज समशेर, ज्ञानेश्वर गवळे, विष्णु पाटील, सतिष गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षपदासाठी प्रविण चव्हाण, किशोर गवळी, विष्णु पाटील व सुबोध अहिरे या ४ जणांची नावे आल्याने मतदान घेण्यात आले. यात एकुण ३२ जणांनी मतदान केल्याने प्रविण चव्हाण यांना सर्वाधिक १४ मते मिळाल्याने त्यांची नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार हंसराज चौधरी यांनी केले तर अध्यक्षीय भाषण साप्ताहिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे यांनी मागील आढावा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन विशाल माळी व जगदीश सोनवणे यांनी केले तर या कार्यक्रमाप्रसंगी साप्ताहिक संघटनेचे सर्व संपादक व पत्रकारांनी मनोगत व्यक्त केली. यादरम्यान विविध विषयांवर चर्चा करून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून दर महिन्याला सर्वसाधारण बैठकीचे देखील आयोजन करण्यात येणार आहे,
असा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रसंगी दिलीप चौधरी, धर्मेंद्र पाटील, विशाल माळी, सतिष गोसावी, वैभव करवंदकर, किशोर गवळी, जगदिश सोनवणे, प्रदीप गरूड, जगदिश ठाकूर, शैलेंद्र ईशी, हाफीक मिर्झा, मनोज समशेर, जीवन माळी, दिनेश सोनवणे, दीपक सोनार, सुमानसिंग राजपूत, एम.डी.शाह जितेंद्र पाटील, पंकज सिंधी, विरेंद्र गिरासे, चिरोगोद्दीन शेख आदी उपस्थित होते.