नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील काकडदा परिसरात अवकाळी पावसाने आज झोडपले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. असा अंदाज जिल्हा प्रशासनाने दिला होता.
27 डिसेंबर दुपारी दोन वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील काकडदा परिसरात अवकाळी पाऊस सुमारे अर्धा तास चालला. तसेच तसेच मोलगी, असली, तलाई या परिसरात तुरळक पाऊस होता. नंदुरबार जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांना फटका बसला होता. त्यातच आता होणाऱ्या अवकाळी पावसामुळे रब्बीचे पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.