नंदूरबार l प्रतिनिधि
-केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे दिनांक 26 डिसेंबर 2024 ते 27 डिसेंबर 2024 या दोन दिवसीय जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, यात ते जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या संदर्भात तसेच होत असलेल्या प्रशासकीय कामांवर भेटी देऊन, स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाची चर्चा करणार आहेत.
यात दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी नऊ पंचेचाळीस वाजेला नंदुरबार प्रकल्प कार्यालयाच्या आदिवासी विभागाच्या केंद्रीय सेंट्रल किचन प्रकल्पाला भेट देऊन त्या प्रकल्पाची पाहणी करणार असून, यानंतर साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या आकांशीत जिल्हा प्रकल्प अंतर्गत निर्देशांक त्यांच्या कामगिरीबद्दल आढावा बैठक, तसेच साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे इतर शासकीय योजनांच्या लाभार्थी यांच्या समवेत चर्चा, तसेच 12 वाजेच्या दरम्यान ते जिल्हाधिकार्यालय येथून कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे भेट व पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,
तसेच दुपारी तीन वाजेच्या दरम्यान नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शासकीय आश्रम शाळेत भेट देऊन तेथे विद्यार्थ्यांची संवाद साधणार, त्याचप्रमाणे सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान मौजे काकरदे येथील येथील देवराई सामूहिक शेती दूध खरेदी केंद्र व पाणी व्यवस्थापन केंद्र या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार, तसेच दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सव्वा नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान नवापूर तालुक्यातील मौजे भवरे येथील पिंजऱ्यातील मच्छी शेती केंद्रास भेट देऊन पाहणी करणार व त्यानंतर तिथून ते सव्वा बारा वाजेच्या दरम्यान गुजरात सुरत येथे प्रयाण करून पुढील प्रवास करणार, असे नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.