नंदुरबार l प्रतिनिधी-
शहरातील बालवीर चौक परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 90 व्या जयंती निमित्त प्रतिमापूजन आणि वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष गोपाल लगडे यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी मंडळाचे सदस्य संभाजी हिरणवाळे, प्रा. एकनाथ हिरणवाळे, हेमराज लगडे, हेमंत नागापुरे, सिद्धेश नागापुरे, रोहित नागापुरे, प्रफुल्ल राजपूत, विशाल हिरणवाळे, चेतन गवळी आदी उपस्थित होते.








