नंदुरबार l प्रतिनिधी
रासेयो शिबिराच्या माध्यमातून सामाजिक सेवा जोपासतानाच मानसिक स्वास्थ्य सुद्धा जोपासले जाते. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर गावाचा विकास करावा असे प्रतिपादन म.फु.कृ.वि. चे रासेयो, संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण हे टोकर तलाव येथील राष्ट्रीय सेवा योजने च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे युथ फॉर माय भारत आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत टोकरतलाव ता. जि. नंदुरबार येथे करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन म.फु.कृ.वि. चे रासेयो, संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता, डॉ. यु. बी. होले होते. कार्यक्रमास टोकरतलावच्या सरपंच सौ. जयमाला गावित, पोलीस पाटील अमृत वसावे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, व सर्व शिक्षक, तसेच सहाय्यक प्रा. डॉ. एस. एस. वाघ, विद्यार्थी स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन आणि विद्यापीठ गीत व रासेयो गीताने करण्यात आली.
डॉ. चव्हाण यांनी कॉलेज- नॉलेज- व्हिलेज ही संकल्पना स्वयंसेवकांच्या मनात रुजवली व आपल्या स्वरचित कविता च्या माध्यमातून उपस्थितांची मनी जिंकली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. डॉ. यु. बी. होले, म्हणाले की शिबिराच्या माध्यमातून झालेले संस्कार आयुष्य घडवण्यास मदत करतात. व शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय शिबिराच्या आयोजनाबद्दल गावाच्या सरपंच सौ. जयमाला गावित यांनी आनंद व्यक्त केला व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस. जी. राजपूत यांनी केले. तर सूत्रसंचालन कु. सेजल पवार व चि. पृथ्वीक पाडवी यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. पी. खोंडे, कृषि सहाय्यक श्रीमती ए. जे. गायकवाड, संदीप नेरकर व सुरेंद्र गवळी मेहनत घेत आहेत.