नंदूरबार l प्रतिनिधी
महामानव डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणा-या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना तात्काळ पदावरून हटवा,अशी मागणी आदिवासी संघटना जिल्हा नंदूरबार यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.
यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहीदास वळवी,बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी,सामाजिक कार्यकर्ता सा-या पाडवी,बिरसा फायटर्स राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,बिरसा फायटर्स विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,राकेश मोरे बिरसा फायटर्स आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या सभागृहात दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी आंबेडकर, आंबेडकर अभी यह नाम फॅशन हो गया है, इतनी बार भगवान का नाम लेते, तो सात जनम में भगवान भी मिल जाते! अशा शब्दांत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे.गृहमंत्री अमित शहा यांच्या या बेताब वक्तव्यामुळे एस सी एस टी व समस्त मागासवर्गीय बांधवात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.गृहमंत्री अमित शहा यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.महामानव डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले.त्या संविधानाच्या आधारावरच संपूर्ण देशाचा कारभार चालतो.अमित शहा हे भारतीय संविधानाच्या आधारेच देशाचे गृहमंत्री पदावर बसले आहेत, हा अधिकार त्यांना डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाला आहे,याचे भान अमित शहा यांना राहिले नाही.तसेच कोणत्याही महापुरुषांची टिका टिंगल करण्याचा अधिकार गृहमंत्री अमित शहा यांना नाही. अमित शहा यांच्या बेताब वक्तव्यामुळे समस्त एस सी ,एसटी व मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचे तीव्र पडसाद आंदोलनाच्या माध्यमातून देशभर पडत आहेत.
देशात कायदा व सुवस्था बिघडवण्याचे काम अमित शहा यांनी केले आहे.महापुरुषांचा अपमान करणा-या अशा व्यक्तीला गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही.म्हणून अमित शहा यांना गृहमंत्री पदावर तात्काळ हटविण्यात यावे,लोकसभा सदस्य पदावरून सुद्धा काढून टाकण्यात यावे,अन्यथा गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांकडून देण्यात आलेला आहे.