Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जगातील सर्वात मोठ्या दिव्य, दुर्लभ शेषशाही श्री नारायण मूर्तीचे 11 जानेवारीला शहाद्यात आगमन

team by team
December 21, 2024
in राज्य
0
जगातील सर्वात मोठ्या दिव्य, दुर्लभ शेषशाही श्री नारायण मूर्तीचे 11 जानेवारीला शहाद्यात आगमन

शहादा l प्रतिनिधी

शहादा शहरापासून दोन किलोमिटर असलेल्या श्री श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरातील गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दखल घेतलेल्या जगातल्या विशिष्ट अशा 11 फूट उंच आणि 21 टन वजनाच्या पंचधातूपासून निर्मित शेषशाही विष्णू मूर्ती इंदोर ते शहादा असा 250 किलोमीटरचा प्रवास करून 11 जानेवारी रोजी शहादा येथील मंदिरात दाखल होणार आहे. 12 ते 15 जानेवारी दरम्यान तीन दिवसीय भगवान विष्णू महायात्रेच आयोजन श्री श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरात करण्यात आले आहे.

 

इंदोर येथील राजवाडा येथून 9 जानेवारी गुरुवार रोजी सकाळी ही महाकाय मूर्ती भक्तांसहित निघणार असून राहू, महू, ठिकरी, वरुफाटक, जुलवानिया, गुजरी, सेंधवा, निवाली , पानसेमल, खेतिया असा तीन दिवसांचा मार्गक्रमण करीत शहादा येथे 11 जानेवारी 2025 रोजी दाखल होणार आहे. यावेळी 11 जानेवारीला शहादा शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी सत्संग, भजन, कीर्तन आणि महापूजा असे आयोजन करण्यात आले आहे.

 

14 जानेवारीला विशाल भक्तिमोत्सवात उत्तरायण महापर्व म्हणजेच संक्रांतीला दुपारी 12 वाजेता ही विराट श्री नारायण मूर्ती निर्माण होत असलेल्या नारायणपूरम येथील नारायण मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करणार आहे.

 

12 ते 15 जानेवारी असे तीन दिवस श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरात सर्व कल्याण महापूजा आणि श्रीमद् भागवत कथेचे देखील आयोजन मंदिर समिती द्वारे करण्यात आले आहे.
या इंदोर ते शहादा विष्णू महायात्रेत महाराष्ट्र, गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील भक्तांचा समावेश राहणार असून या महायात्रेत भगवान विष्णूचे दुर्लभ दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री श्री नारायणपूरम श्री मंदिराच्या समितीद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

साखरपुड्यात केला विवाह, राजपूत समाजाचा आदर्शवत निर्णय

Next Post

गृहमंत्री अमित शहा विरोधात आदिवासी संघटना आक्रमक; गृहमंत्री पदावरून हटविण्याची मागणी

Next Post
गृहमंत्री अमित शहा विरोधात आदिवासी संघटना आक्रमक; गृहमंत्री पदावरून हटविण्याची मागणी

गृहमंत्री अमित शहा विरोधात आदिवासी संघटना आक्रमक; गृहमंत्री पदावरून हटविण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add