नंदुरबार l प्रतिनिधी
अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देऊन आपल्या परिवारात साखरपुड्यासारखा खर्चिक समारंभ न करता फक्त विवाह संस्कार करून आपण राजपूत समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे.
यासाठी क्षत्रिय राजपूत समाज समिती यांच्या वतीने
टोकरतलाव येथील ग.भा कोकीलाबाई देविदास राजपूत व नंदुरबार येथील श्री संतोष पांडुरंग राजपूत या दोघी परिवारांचा सन्मानपत्र देऊन या दोघी परिवारांच्या सत्कार करण्यात आला अनिष्ट रूढी परंपरा थांबवण्यासाठी आपल्या नातेवाईकांना प्रेरित करावे अशी अपेक्षा क्षत्रिय राजपूत समाज समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त करून संपूर्ण कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
यापुढे राजपूत समाजामध्ये खर्चिक अनिष्ट परंपरा यांना फाटा देणाऱ्या कुटुंबियांच्या सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणारा आहे सत्कार प्रसंगी क्षत्रिय राजपूत समाज समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत, कार्याध्यक्ष मोहितसिंग राजपूत, उपाध्यक्ष पवन राजपूत, सचिव जितेंद्र राजपूत, खजिनदार दीपक राजपूत, संचालक राजेश राजपूत, हेमंतसिंग राजपूत, रत्नदीप राजपूत, पंकज राजपूत, शरद राजपूत, सुमानसिंग राजपूत, अजय राजपूत, हेमंत राजपूत, धर्मेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.