नंदुरबार l प्रतिनिधी-
लोकसभा निवडणूकीत ज्या मतदारांची मतदान यादीतून नावे अचानकपणे गायब झाली आहेत, अशा मतदारांना आपले नांव मतदार यादीत समाविष्ठ करून घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीन दिवशीय मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा प्रारंभ शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे यांच्या उपस्थित करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश हराळे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल कोळी, उपजिल्हाध्यक्ष छोटू चौधरी, युवासेनेचे जिल्हासचिव दिनेश भोपे, सोशल मिडीया समन्वयक आनंदा पाटील, आयान खाटीक आदी उपस्थित होते. नाव पत्ता, वय यातील बदलही या अभियानात करता येतील अशी माहिती अर्जुन मराठे यांनी दिली.