Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी. आर. हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

team by team
December 17, 2024
in शैक्षणिक
0
डी. आर. हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी-

येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 चे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कला प्रकारांनी संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ॲड. परिक्षीत मोडक, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सराफ, ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य आ. बा. टेंभेकर, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण व हेमंत खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, नटराज मूर्ती चे पूजन, दीप प्रज्वलन संपन्न झाले. उद्घाटनपर भाषणात संस्थेचे चेअरमन अँड परिक्षीत मोडक यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा देऊन उद्घाटन झाले असे जाहीर केले व कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कराओके ट्रॅक वर गीतगायन, वैयक्तिक व समूह नृत्य, मराठी हिंदी इंग्रजी नाटिका, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, विनोद, चुटकुले, बातम्या इत्यादी कलाप्रकार सादर करून सर्व कलारसिकांची दाद मिळवली. यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे शिवराज्यभिषेक सोहळ्याचा सजीव देखावा जवळपास चाळीस विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्याने सादर केला.

यामधे शाळेचे मुख्याधयापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक हेमंत खैरनार, कला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी, विशाल मछले यांनी देखील सहभाग घेतला. या सादरीकरणास शाळेतील सर्व शिक्षक पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वेगवेगळी बक्षिसे जाहीर केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी यांनी सामूहिक नृत्य करून विद्यार्थ्यांमध्ये समरूप होऊन स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला.

स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी स्नेहसंमेलन प्रमुख हेमंत खैरनार, कला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी, नृत्य शिक्षक प्रितेश गागडे, विशाल मच्छले, प्रशांत पाटील, योगेश गवते आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सुहास वळवी यांनी केले तर साऊंड सिस्टिम याचे संपूर्ण नियोजन मास्टर राजेश मच्छले यांनी बघितले.

बातमी शेअर करा
Previous Post

हमीभावाने भरडधान्य खरेदीस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Next Post

शिवसेना ठाकरे गटातर्फे मतदार नोंदणी अभियान

Next Post
शिवसेना ठाकरे गटातर्फे मतदार नोंदणी अभियान

शिवसेना ठाकरे गटातर्फे मतदार नोंदणी अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add