नंदुरबार l प्रतिनिधी
-दिवाळी काळतील तसेच घरातील खंडित झालेल्या देवीदेवतांची मूर्ती नागरीकांकडून इतरत्र मोकळ्या परिसरात ठेवलेल्या आढळतात. या मूर्ती गोळा करुन त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम येथील युवारंग फाउंडेशन व हिरकणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या उपक्रमात नंदुरबार शहरातील कल्याणेश्वर मंदिर, शनी मंदिर, खोडाई माता मंदिर, किलबिल हॉस्पिटल समोरील परिसर, समृद्धी मॉल समोरील परिसर या ठिकाणी जाऊन लोकांनी ठेवलेल्या देवीदेवतांची मूर्ती गोळा करुन त्यांचे प्रकाशा येथील तापी नदीत विसर्जन करण्यात आले.
नंदुरबार शहर आपल्या सर्वांचे आहे, ते सुंदर व स्वच्छ रहावे. सर्वांनी मातीच्या मूर्तींचा अवलंब करावा. पीओपीच्या मूर्ती टाळून पर्यावरण पूरक मूर्तींचा वापर करावा, असे आवाहन युवारंग व हिरकणी फाउंडेशनतर्फे यावेळी करण्यात आले. यावेळी युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे, उपाध्यक्ष देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी, उपाध्यक्षा प्रियंका पाटील, मिनाक्षी पाटील, पुजा जाधव, भावेश मंडलिक, शिवम गोस्वामी, रिक्षा चालक सुरेश राजपूत आदींनी परिश्रम घेतले.