Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील शिधापत्रिकांना मोबाईल क्रमांक जोडणे बंधनकारक

team by team
December 12, 2024
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यातील शिधापत्रिकांना मोबाईल क्रमांक जोडणे बंधनकारक

नंदुरबार l प्रतिनिधी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील  एकूण 2,94,195 शिधापत्रिकांना किमान एक मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांत तेथील ई-पॉस मशीनद्वारे केले जात आहे. सदर सुविधा रास्तभाव दुकानातील लाभार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध असल्याचे जिल्हा पुरवठा गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

शिधापत्रिकांना किमान एक मोबाईल नंबर जोडण्याचे काम सुरु असून जिल्ह्यात अक्कलकुवा (93.83%), अक्राणी (87.04%), नंदुरबार(97.92%), नवापूर(95.47%), शहादा(95.81%), तळोदा(98.04%) याप्रमाणे एकूण 95.22% शिधापत्रिकांना किमान एक मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम झाले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले मोबाईल क्रमांकावर त्या शिधापत्रिकेला देय धान्याबाबत संदेश दरमहा शासनामार्फत पाठविण्यात येतो. त्यात सदर शिधापत्रिकेचा 12 अंकी क्रमांक, देय गहू, तांदूळ, भरडधान्य तसेच त्यावर आकारण्यात येणारे शुल्क (सध्या निशुल्क आहे) व PDS हेल्पलाईन क्रमांक इ. बाबत तपशिल समाविष्ट आहे.

जिल्ह्यात अद्याप 14,060 शिधापत्रिकांना किमान एक मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम प्रलंबित आहे. अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील नो नेटवर्क क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध झाले आहे. त्यानुसार आता अतिदुर्गम क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांना मोबाईल क्रमांक जोडणीचे काम सुरु आहे. मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत तेथील ई-पॉस मशीनद्वारे केले जात आहे. सदर सुविधा रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील ज्या शिधापत्रिकाधारकांची मोबाईल क्रमांक जोडणी प्रलंबित आहे अशा लाभार्थ्यांनी आपल्या रास्तभाव दुकानातून 31 डिसेंबर 2024 पावेतो मोबाईल क्रमांक जोडणी करून घ्यावी तसेच आपल्या शिधापत्रिकेला मोबाईल क्रमांक जोडणी प्रक्रिया झाली आहे किंवा नाही याबाबत आपल्या रास्तभाव दुकानदाराकडून खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी केले आहे.

*लाभार्थ्यांचा असा संदेश प्राप्त होतो*
“आपल्याला माहे सप्टेंबर,२०२४ करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे RCID-272028671605, गहू ६ कि.ग्रॅ.,तांदूळ ० कि.ग्रॅ.,उडीद डाळ ० कि.ग्रॅ.,मका ० कि.ग्रॅ.,ज्वारी ० कि.ग्रॅ.,बाजरी ० कि.ग्रॅ.,नाचणी ० कि.ग्रॅ.,फोर्टिफाइड तांदूळ ९ कि.ग्रॅ. अन्नधान्य भारत सरकारच्या निर्णयानुसार नि:शुल्क/मोफत अनुज्ञेय आहे. धान्य घेतल्याची पावती आवश्य घ्यावी. पीडीएस हेल्पलाइन क्र.१८००२२४९५० व १९६७.”

बातमी शेअर करा
Previous Post

इतरत्र ठेवलेल्या मूर्ती गोळा करुन लावली योग्य विल्हेवाट, युवारंग व हिरकणी फाऊंडेशनचा उपक्रम

Next Post

ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावूया : धनंजय गोगटे

Next Post
ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावूया : धनंजय गोगटे

ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावूया : धनंजय गोगटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add