नंदुरबार l प्रतिनिधी-
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शहर शाखेच्यावतीने बांगलादेशमधील अल्पसंख्यांक, बौद्ध, ख्रिश्चन, सिख, हिंदू समाजावर होत असलेले हल्ले व मानव अधिकारांना दडपण्याच्या प्रकरणांच्या निषेध नोंदवण्यात आला.
बांगलादेश येथे मागील अनेक दिवसापासून हिंदू सिक बौद्ध समाजावर प्राणघातक हल्ले होत आहेत तसेच तेथील समाज मंदिरे प्रार्थना स्थळे व धार्मिक स्थळे तोडण्याचे काम मुस्लिम कट्टर पंथीयांकडून केले जात आहे याच्या आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येऊन सोमवार (दि.९ डिसेंबर) रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात निषेध व्यक्त केला तसेच जगातील व देशातील मानव अधिकार कार्यकर्त्यांचे झालेली डोळेझाक याचेही निषेध या ठिकाणी व्यक्त केला बांगलादेश सरकारच्या विरोधात जोरदार तीव्र घोषणा देऊन याच्या निषेध व्यक्त करण्यात आला.
बांगलादेशात होत असलेल्या या घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहेत, अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला गेला. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा सहसंयोजक भावेश मराठे, जिल्हा छात्रशक्ती प्रमुख सागर साठे, नंदुरबार शहर मंत्री कमलेश राजपूत, महाविद्यालय अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, क्षितिज पाटील, केशव पाटील, कमलेश मराठे, आदेश पाटील, हिमांशू कुंभार, पियुष गुजराथी, जय वानखेडे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी येऊन निषेध व्यक्त केला.