नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सी एच राजपालसिंग मेमोरियल संस्था व ट्रस्ट ऑफ पीपल यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना निवडक गावांमध्ये जाऊन सी एच राजपालसिंग मेमोरियल संस्था व ट्रस्ट ऑफ पीपल यांच्या मार्फत दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात महिलांना ब्युटीपार्लर फूड फ्रॉसेसिंग इत्यादी उपक्रमांचे नियोजन करून माहिती देण्यात आली..नंदुरबार तालुक्यातील निवडक गावांमध्ये जाऊन महिलांना 10 दिवसाचे प्रशिक्षण संपल्यानन्तर प्रशिक्षणार्थी महिलांची परीक्षा घेण्यात आली.
यात पास झालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणात व किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून चोपाळे येथील सरपंच नामदेव भिल. खोंडामळी येथील सरपंच रोहिणी पाटील. खोंडामळी येथील ग्रामपंचायत अधिकारी पंकज पिंपळे , भवाली येथील सरपंच रीना नाईक , शिंदे येथील सरपंच गणेश भिल व विविध उपक्रमाचे आयोजक उमरदे येथील गोपी चव्हान हे उपस्थित होते.