नवापूर | प्रतिनिधी-
नवापूर बेडकी नाक्यावर पोलीसांनी छापा टाकत वाहनासह ४ लाख २४ हजार ४०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला असुन याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने गुजराथ राज्यातील सोनगड येथुन महाराष्ट्रातील नवापूर बेडकी नाक्यावर येथे येत असलेला महाराष्ट्र राज्यातील प्रतिबंधित केलेला तंबाखु जन्य विमल पानमसाला गुटखा व तंबाखु वाहतुक करणारी मारुती ओमनी चार चाकी गाडी (क्र.जी.जे.२१, एम.१०४९) ही गाडी नाकाबंदी लावुन ती थांबवुन झडती घेतली असता, वाहनाची किंमत ५० हजार असा एकुण ४ लाख २४ हजार ४०० रुपये किंमतीचा खाकी व पांढर्या रंगाची गोनीत केसर युक्त विमलपान मसाला गुटका व तंबाखु मिळुन आला असुन सदर वाहनावरील चालक सोहेल युसुब पठाण रा.इस्लामपुरा ,नवापूर यास ताब्यात घेतले असुन त्या सोबत असलेला एक इसम कक्कर पळुन गेला आहे. सदर मुद्देमाल नवापूर येथील गुटखा व्यापारी सोहेब युसुफ पठाण रा.नवापूर याचा मालकीचा आहे.याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात भादवी कलम ३२८,१८८,२७२ सह अन्य सुरक्षा मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी गुन्हाच्या तपास पोलिस निरीधक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, पोलिस नाईक दिनेश वसुले,कैलास तावडे आदी करीत आहे.








