नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व २ विषय समिती सभापतींचे रिक्त पद भरणे आवश्यक आहे. त्यासाठी २५ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद तसेच दोन विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी उपविभागीय अधिकारी, शहादा यांची पिठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन शाखेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून सहकार्य करतील. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.