नंदुरबार l प्रतिनिधी
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध जनजागृती सह उपाययोजना करण्यात येतात. मात्र अनेक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत. मात्र मैत्रेयी बोरसेने पाचशे किलोमीटरचा प्रवास करत प्रथमच मतदानाचा हक्क बजावला.
नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या चार मतदार संघात 72 .33 टक्के मतदान झाले. गेल्या महिन्याभरापासून मतदानाच्या टक्का वाढावा. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत होती. असे असले तरी 28 टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. मात्र लोकशाही बळकट करण्यासाठी अमूल्य असे मताचा अधिकाराची जाणीव असलेल्या नागरिकांनी विविध अडचणीत मतदान बजावल्याचे बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले.
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील मैत्रेयी विजय बोरसे या मुंबई येथे कंप्लायंस ॲाफिसर म्हणून कार्यरत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदानासाठी त्यांनी 500 किलोमीटरचा थर्ड ए सि ने प्रवास करून गाव गाठले. व तिथे मतदानाचा हक्क बजावला.मैत्रेयी विजय बोरसे यांनी प्रथमच मतदान केले. विशेष म्हणजे आजोबा भास्करराव हिरामण पाटील, वडील विजय भास्करराव बोरसे यांनी सह पत्नी मतदान केले. यावेळी तीन पिढ्यांनी एकत्र मतदान केंद्रावर जात मतदान केले.