नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हा एडस नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय नंदुरबार व युवारंग फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने India@७५ अंतर्गत एचआयव्ही,एडस या विषयावर एक प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन आयोजन एस.ए. मिशन हायस्कुल, नंदुरबार येथे करण्यात आले होते. यांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉ. राजेश वसावे, रमाकांत पाटील, नितीन मंडलिक, विश्वास सूर्यवंशी, प्रा. नुतनवर्षा वळवी, सी.पी. बोरसे हे होते. यावेळी विद्यार्थ्यांचे पाच गट होते त्यांना एचआयव्ही या विषयावर प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक एस.ए. मिशन (अलिना परायील व रिया वासवानी) ५ हजार व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक डी. आर. ज्यु. कॉलेज (भाविनी साळवे व जागृती देवरे)२ हजार व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांक श्रॉफ ज्यु. कॉलेज (जयेश देवरे व दिपक बडगुजर) १ हजार व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही, कोरोना व इतर सांसर्गिक आजारांबाबत अधिक जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे तसेच या विषयांवर देखील अभ्यास केला पाहिजे. असे डॉ. राजेश वसावे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे अँकरींग जितेंद्र लुळे यांनी केले. संयोजन मनिष पाडवी यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद दिक्षीत यांनी केले. तसेच प्रश्न विद्यार्थ्यांना इंग्रजीत सांगण्यासाठी प्रतिक्षा वळवी या होत्या. तसेच युवारंग फाउंडेशनचे उपाध्यक्ष, देवेंद्र कासार, सचिव राहुल शिंदे, सदस्य ऋषिकेश मंडलिक, शुभम पाटील, प्रणव पवार भावेश मंडलिक, यांनी परिश्रम घेतले.








