नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील शेतातील पत्र्याच्या शेड मधून शेतकऱ्यांनी वेचणी करून ठेवलेला 14 क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना मंगळवार वारी सकाळी समोर आली या घटनेमुळे रनाळे सह परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून वर्षभराची कमाई चोरीला गेल्याने
शेतकरी हताश झाला आहे अज्ञात चोरट्यांविरोधात तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी प्रशांत लक्ष्मण नागरे यांचे रनाळे शिवारातील शेत असून त्या ठिकाणी पत्री शेड तयार करण्यात आला होता या ठिकाणी शेतकऱ्याने आपल्या शेतातील कपाशीचा वेचून पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला होता. एकूण 14 क्विंटल असलेल्या कापूस बाजारभावाप्रमाणे साधारणता एक लाखाच्या वर रुपयाचा कापूस असल्याने त्याची विक्री करण्याची तयारी केली होती.
मंगळवारी शेतकरी प्रशांत नागरे व मोठा भाऊ नेहमीप्रमाणे शेतात सकाळी गाईचे दूध काढण्यासाठी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गेले होते. पत्र्याच्या शेडचा दरवाजावरील लोखंडी गजच्या साह्याने कुलूप तोडून साठवलेला कपास अज्ञात चोरट्यांनी अज्ञात वाहनाच्या साह्याने शेता लगत असलेल्या नाल्यामधून चोरून नेल्याचे निर्दशनास आले.
याप्रकरणी शेतकरी प्रशांत नागरे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात त चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मनोज चव्हाण तपास करत आहेत शेतशिवारातील पीक चोरीच्या व मोटार व केबल वायर चोरण्याची घटना मध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन अज्ञात भामट्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांतर्फे व शेतकऱ्यांनी तर्फे मागणी करण्यात येत आहे.