नंदुरबार l प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रमासाठी 7 शाळांचे 6000 विद्यार्थी व 300 शिक्षकांच्या सहभागाने मानवी साखळी तयार करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील एस.ए. मिशन हायस्कुलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्राचा नकाशा, निवडणूकीचा लोगो, स्विप नंदुरबार चा उल्लेख तसेच चला मतदान करु या असे आवाहन करणारे रेखाटन करुन त्यावर विद्यार्थी आणि शिक्षक यांना बसवून मानवी साखळीद्वारे जिवंत रांगोळी तयार करण्यात आली.
कार्यक्रमाचा शुभारंभ तिरंगी फुगे हवेत सोडून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि स्विप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, शरद पाटील, रेखा पानपाटील नंदुरबार तालुक्यातील केंद्रप्रमुख, शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते.
या प्रसंगी एस.ए. मिशन हायस्कुलच्या विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, निवडणूक गीत, भाषण व फ्लॅश मॉब कार्यक्रम सादर करण्यात आले. त्याच बरोबर डॉ. काणे गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनीने निवडणूकीच्या गीतावर लावणी सादर केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आवाहन करुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. समारोप प्रसंगी उपस्थितांना मतदानाची शपथ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
आणि जिल्हाधिकारी यांनी उस्फुर्तपणे सेल्फी घेतल्या.
*कार्यक्रम संपवून परत जातांना सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी मानवी साखळीच्या मार्गातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि शिक्षकांच्या सेल्फी घेऊन सहभागींचा उत्साह वाढविला.
नंदुरबार तालुक्याचे कला शिक्षक राजेंद्र ठाकुर, आनंदराव पवार, संतोष पाडवी, प्रकाश सोनवणे, किरण कुंवर, सिध्दांत माळी, नरेंद्र सरोदे, महेंद्र सोमवंशी, धनंजय खंडारे, शशिकांत शिंपी, प्रदिप देसले, दिपक माळी, चंद्रशेखर चौधरी आणि देवेंद्र कुलकर्णी यांनी मानवी साखळीचे उत्कृष्ट रेखाटन केल्यामुळे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, प्राचार्य नुतनवर्षा वळवी, एस.ए.मिशन शैक्षणिक संस्थेचा शिक्षक परीवार तसेच प्राचार्य सुहासिनी नटावदकर, निंबा माळी, सिमा मोडक, राजश्री अहिरराव, तारकेश्वर पाटील यांनी परीश्रम घेतले.