Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेरीने नंदुरबार शहरात बनले भाजपा महायुतीमय वातावरण

team by team
November 13, 2024
in राजकीय
0
डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेरीने नंदुरबार शहरात बनले भाजपा महायुतीमय वातावरण

नंदुरबार l प्रतिनिधी-

भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार शहरातून काढलेली प्रचार फेरी खरोखर झंजावाती ठरली. विविध प्रकारची निवडणूक गीते, जागो जागी फडकणारे भगवे झेंडे, लाडक्या बहिणीं प्रमाणेच युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हे या रॅलीचे मोठे वैशिष्ट्य ठरले. नंदुरबार शहरात भाजपा महायुतीच्या वातावरण निर्मितीने उंची गाठलेली दिसली.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241113-WA0027.mp4

मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी नंदुरबार शहरातील मध्यवर्ती प्रमुख भागात मतदारांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी प्रचार फेरी काढली. मतदारांकडून त्याला मोठा प्रतिसाद लाभल्याचे पहायला मिळाले. मागील तीस वर्षापासून चालू असलेला नंदुरबार शहराचा आणि जिल्ह्याचा विकास कायम राखण्यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यालाच पुन्हा निवडून द्या, असे आवाहन प्रचार फेरीतील पदाधिकारी करताना दिसले.

 

त्यांच्या समवेत भाजपाचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, डॉक्टर विक्रांत मोरे, माजी उपनगराध्यक्ष श्याम बापू मराठे, माजी गट नेते चारुदत्त कळवणकर, मोहन खानवाणी, आनंद माळी, लक्ष्मण माळी, माणिक माळी, नरेंद्र माळी, संतोष भाऊ वसईकर, रिपब्लिकन पार्टीचे सुभाष पान पाटील, केतनभैया रघुवंशी, धनराज गवळी, पावभा मराठे, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश छगन चौधरी, ईश्वर धामणे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त युवराज पाटील, जगदीश पाटील, संजू भाई शहा, जितेंद्र मराठे, योगेश पाटील, सपना अग्रवाल, संगीता सोनवणे, काजल मच्छले, सरिता चौधरी, दिव्या जोशी, रत्ना चौधरी, सुरेखा पाटील, अर्जुन मराठे, निलेश चौधरी व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक सहभागी होते.

 

 

दरम्यान, सकाळच्या सत्रात मोठा मारुती मंदिर, शक्ती सागर मंडळ, अमर टॉकीज अमृत टॉकीज गोकुळ लस्सी छत्रपती पुतळा पूजन इंदिरा बँक सुभाष चौक सतलज हॉटेल हनुमान व्यायाम शाळा सिद्धी विनायक मंदिर बुरुड गल्ली भोई गल्ली चैतन्य चौक चौव्हाण चौक, राणी लक्ष्मीबाई चौक,

 

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कोहिनुर टॉकीज, जळका बाजार शिवाजी चौक तयकील वाडी तांबोडी गल्ली सुरभी हॉटेल, न्यू इंडिया स्टोर्स तूप बाजार, माणिक चौक, कापड बाजार 1 नंबर शाळा, नवी नगर पालिका नेहरु पुतळा गांधी पुतळा हाट दरवाजा गणपती मंदिर, सोनार खुंट जुने श्री ज्वेलर ब्राम्हण वाडी या परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. नंतर दुपारच्या सत्रात विरल विहार, सार्वजनिक गणेश मंडळ, काका पतपेढी, परदेशी पुरा, शेतकीसंघ, मारुती व्यायाम शाळा, रायसिंग पुरा, पोरवालवाडी या भागातून प्रचार फेरी काढण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

दुर्गम महिला मतदारांमध्ये डॉ. हिना गावित यांचीच क्रेझ; विक्रमी गॅस वाटपामुळे ‘शेगडी’ चिन्हाची चालतेय जादू

Next Post

मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉनमध्ये धावले 275 शिक्षक व 1200 विद्यार्थी

Next Post
मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉनमध्ये धावले 275 शिक्षक व 1200 विद्यार्थी

मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉनमध्ये धावले 275 शिक्षक व 1200 विद्यार्थी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add