Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मतदार जनजागृतीसाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचाराचा शुभारंभ आणि बाईक फेरी

team by team
November 12, 2024
in राज्य
0
मतदार जनजागृतीसाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचाराचा शुभारंभ आणि बाईक फेरी

नंदुरबार l प्रतिनिधी-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रमासाठी केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डीजिटल व्हॅनचा व बाईक रॅलीच शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार शहरात करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, नंदुरबार विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, शरद पाटील, सचिन गोसावी, नंदुरबार तालुक्याचे सर्व केंद्रप्रमुख, नंदुरबार तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच नंदुरबार तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून रॅलीस सुरुवात होऊन नवापूर चौफुली- धुळे चौफुली- श्रॉफ हायस्कुल-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर-अंधारे चौक- नगरपालिका-नेहरू पुतळा-गांधी पुतळा- उड्डाण पूल-सिधी कॉलनी या मार्गाने रॅलीचे आयोजन होऊन शहरातील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीचा शुभारंभ SVEEP चा झेंडा तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगा मार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डीजिटल व्हॅनला देखील हिरवी झंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. सदर व्हॅन नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीचे उपक्रम राबविणार आहे.

रॅलीच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निवडणूकीचे घोषवाक्य लावलेले फुगे हवेत सोडून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, निवडणूक गीत तसेच फ्लॅश मॉब अंतर्गत निवडणूकीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. समारोप प्रसंगी उपस्थितांना मतदानाची शपथ देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे १४ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची सभा

Next Post

आमच्या विरोधी उमेदवाराने कोणते राजकीय आणि विकासात्मक योगदान दिलंय? डॉ. विजयकुमार गावित यांचा प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add