Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेऱ्यांना आता नंदनगरीतही सुरूवात

team by team
November 11, 2024
in राजकीय
0
डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेऱ्यांना आता नंदनगरीतही सुरूवात

नंदुरबार l प्रतिनिधी-

भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्रामीण भागात कॉर्नर सभा घेऊन प्रचाराची उंची गाठलेली असतानाच आता नंदुरबार शहरात देखील आपल्या झंजावाती प्रचार फेऱ्यांना सुरूवात केली आहे. वार्ड क्रमांक 3 व 4 मधील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी प्रचार फेरी काढली असता प्रत्येक कॉलनीत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होताना दिसले.

नंदुरबार शहरातील प्रमुख वळण रस्त्यावरील डॉक्टर विक्रांत मोरे यांच्या कार्यालयापासून या प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली.अमर कॉलनी, सुरज केसरी कॉलनी, बन्सीलाल नगर, म्हाडा कॉलनी, सरगम कॉलनी, दत्त कॉलनी, विमलविहार सोसायटी, भुवनेश्वर कॉलनी, पटेल वाडी, स्वामी समर्थ कॉलनी, गिरीविहार सोसायटी अशा विविध भागातून त्यांनी संवाद साधला.

 

त्यांच्या समवेत भाजपाचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश छगन चौधरी, ईश्वर धामणे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त युवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे, मोहन खानवाणी, आनंदा माळी, संतोष वसईकर, रिपब्लिकन पार्टीचे सुभाष पान पाटील, विनोद वानखेडे, जगदीश पाटील, संजूभाई शहा, जितेंद्र मराठे, योगेश पाटील, सरिता चौधरी, दिव्या जोशी, रत्ना चौधरी, सुरेखा पाटील, अर्जुन मराठे, निलेश चौधरी व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक सहभागी होते.

 

दरम्यान, शहरवासीयांमध्ये महायुती सरकारने राबवलेल्या लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री वयोवृद्ध तीर्थ यात्रा योजना याचे लाभ पुढे सुरू राहणार किंवा नाही तसेच मतदारांनी त्यासाठी काय भूमिका घ्यावी, यावरून मंथन घडत आहे. त्याचप्रमाणे मंत्र डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या तीस वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्याचा कसा विकास झाला, यावर चौकात चौकातील नागरिक मते मतांतरे मांडताना दिसतात.

 

 

वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या राबवलेल्या योजना महाराष्ट्रभर चर्चेत राहिल्या. स्थानिक शेतकऱ्यांना मिळवून दिलेली वीज माफी, पिक विमा योजना, कृषी सहाय्य, तापी बुराई आणि तत्सम पाणी प्रकल्पांना दिलेली गती, महिला बचत गटाच्या माध्यमातून गावागावात सुरू झालेले गृह उद्योग, ठक्कर बाप्पा सारखे योजनांमधून प्रत्येक गावात झालेले रस्ते आणि काँक्रिटीकरण, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या सवलती, भांडे वाटप सुरक्षा संच वाटप आणि लाडकी बहीण योजनेचे लाभ अशा अनेक कामांमुळे डॉक्टर विजयकुमार गावित यांचं नेतृत्व ठळक राहिले आणि सध्या निवडणूक रणधुमाळीत हाच मुद्दा चर्चेचा बनला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ काढली प्रचाररॅली

Next Post

विकास घडवायचाय तर, सक्रिय आमदार निवडणार की निष्क्रिय आमदार निवडणार? : डॉ.हिना गावित

Next Post
डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेऱ्यांना आता नंदनगरीतही सुरूवात

विकास घडवायचाय तर, सक्रिय आमदार निवडणार की निष्क्रिय आमदार निवडणार? : डॉ.हिना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add