नंदुरबार l प्रतिनिधी-
महिला खासदार असताना सुद्धा प्रत्येक गाव वाड्यात अर्ध्या रात्री भेट देणे असो की तेथील समस्या जाणून घेऊन केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून सोडवून आणणे असो, खासदार असताना मी करून दाखवलं. आताही विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मी कुठे कमी पडणार नाही. तुम्ही निवडून दिलेले आमदार कधीच इथे थांबले नाही निवडून आले की मुंबईला निघून जातात. त्या उलट खासदार असतानाही इथल्या आमदाराने केली नाही, इतकी कामे करून दाखवली. मी हमी देते, या विधानसभेत निवडून आल्यावर त्याच्या अनेक पटीने चांगले काम करून दाखवेन, अशा शब्दात अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधताना विश्वास दिला.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावपाड्यांना भेटी देत अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचे झंजावाती दौरे सध्या सुरू आहेत. त्या अंतर्गत मांडवी बु गटात त्यांनी काकरपाटी, बिजरी, गौऱ्या, खरवड, मांडवी बु, मांडवी खु व अन्य गावांमध्ये त्यांनी संपर्क दौरा केला. यादरम्यान गावागावात घेतलेल्या कॉर्नर सभांमधून मतदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मागील 35 वर्षात सातत्याने काँग्रेसचे आमदार इथून निवडून आले. परंतु या दुर्गम भागात ना रस्ते झाले ना वीज मिळाले ना कुठला विकास झाला. त्या उलट दहा वर्षांपूर्वी मी प्रथमच खासदार बनली तेव्हा तोरणमाळ पासून ऊर्जा भादल पर्यंत रस्ता नव्हता त्या रस्त्याला मंजुरी मिळवून दिली.
मी केलेल्या त्या प्रयत्नांमुळे 56 किलोमीटरचा तो रस्ता आता भक्कम स्वरूपात आकाराला येत आहे. उदय नदीच्या काठावरील लोकांना वीस वीस तीस तीस किलोमीटर पायी चालून दैनंदिन गरजा पूर्ण कराव्या लागत होत्या स्थानिक नेते अशा प्रसंगात कुठे होते? त्या भागाला सुद्धा आम्ही न्याय दिला 45 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे नुकतेच भूमिपूजन पार पडले. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे वाईट दिवस संपवायचे असतील तर आमच्या विकास कार्याला साथ द्या परिवर्तन घडवा. तुम्ही परिवर्तन घडवा आम्ही कायापालट घडवू; असे डॉक्टर हिना गावित यांनी आपल्या भाषणात सांगितले.