म्हसावद । प्रतिनिधी:
शहादा तालुक्यातील नागझिरी गावाजवळ असलेले उकलापाणी येथे म्हसावद पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यवत निर्मित व विना परवाना बियर चा एकूण दोन लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक श्रावण दत्त याना माहिती मिळाल्यानुसार म्हसावद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी नागझिरी गावाजवळ असलेले उकलापाणी येथे बिजला तेजला वळवी यांच्या राहत्या घराच्या ओडासाला रतीलाल आलम भिल हा पॉवर कुल बियरची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गुन्हा मुद्देमाल लपविल्याची बातमी मिळाली त्यानुसार पोलिसांनी धड टाकली असता त्याठिकाणी दोन लाख ४७ हजार २०० रुपये किमतीचा एका खाली रंगाच्या खोक्यात एकूण २४ नाग पत्राच्या डब्यात ५०० मिलीं त्यावर इंग्रजीत पॉवर कुल स्ट्रॉंग बियर असे लिहिलेले एकूण १०३ बॉक्स मिळाले प्रत्येक बियर ची १०० रुपये प्रमाणे जप्त करण्यात आला.
यापथकात पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील,जमादार सुनिल बागुल,हवालदार जितेंद्र पाडवी,रामदास पावरा,अजित गावित,राकेश पावरा,दादाभाई साबळे,उमेश पावरा,वसंत वसावे,सचिन तावडे आदी सहभागी झाले होते वरील सर्व पोलिस कर्मचारी ची वरिष्ठांनी कौतुक केले आहे पुढील तपास जामदार राजेंद्र चव्हाण हे करीत आहे.