Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निवडणुकीत सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यास निर्बंध :जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Mahesh Patil by Mahesh Patil
October 28, 2024
in राज्य
0
तापी नदीकाठावरील नागरिक व गावांनी सतर्कतेता बाळगावी : डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यातील कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या संदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जारी केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2024 पासून घोषित केला आहे. या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रूग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या आवारात तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आदेशित केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खटाखट देऊ सांगणारे केवळ थापा मारतात; महायुती सरकार मात्र प्रत्येक घटकाला देत आहे: डॉ. विजयकुमार गावित

Next Post

नंदनगरीच्या द्वारकाधीश मंदिरात वसुबारसनिमित्त भाविकांचा उत्साह

Next Post
नंदनगरीच्या द्वारकाधीश मंदिरात वसुबारसनिमित्त भाविकांचा उत्साह

नंदनगरीच्या द्वारकाधीश मंदिरात वसुबारसनिमित्त भाविकांचा उत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

June 21, 2025
जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

June 21, 2025
मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

June 21, 2025
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

June 17, 2025
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

June 17, 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

June 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group