नंदूरबार l प्रतिनीधी
नंदुरबार येथे पोलीस स्मृती दिनी शहीदांना जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख मधील भारतीय सीमेवर समुद्र सपाटीपासुन सुमारे 16,000 फुट उंच व अत्यंत थंड हवामानाचे ठिकाणी सब-इन्स्पेक्टर किरण सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण 10 जवान सुरक्षा गस्त घालीत असतांना सिमेपलीकडून दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानकपणे त्यांचेवर प्राणघाती हल्ला चढविला होता.
त्यावेळी आपले जवानांनी अत्यंत बिकट परिस्थितीशी झुंज देत शेवटचे क्षणापर्यत शौर्याने लढा देऊन स्वतः विरगतीला प्राप्त झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशभर दुखाची कळा पसरली होती. भारताचे या वीर जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्यापासून सर्वांना स्फुर्ती मिळावी तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव राहावी म्हणुन संपुर्ण देशभर 21 ऑक्टोबर हा “पोलीस स्मृती दिन” म्हणून पाळला जातो.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित “पोलीस स्मृती दिन” कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत शहीद जवानांना पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, येथे पुषचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये आजवर देशभरातील कर्तव्य बजावतांना वीरमरण आलेल्या 214 शहीदांना मानवंदना देण्यात आली. सदर कार्यक्रमावेळी जिल्हयातील पोलीस अधिकारी, अंमलदार, तसेच स्वातंत्र सेनानी, सामाजिक कार्य करणारे प्रतिष्ठीत व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक असे उपस्थित होते.