नंदुरबार l प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री, 9 वेळी खासदार राहिलेले स्वर्गीय माणिकराव गावित यांचे पुत्र, भाजपाचे नेते भरत गावित यांनी भाजपाला रामराम करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत आज प्रवेश केला.त्यामुळे नवापूर विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटणार असल्याचा कयास लावला जात आहे. भरत गावित हे नवापूर विधानसभेसाठी इच्छुक आहे.मागील विधानसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता.
आज दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष स्व. माणिकराव गावीत यांचे सुपुत्र नवापूर मतदार संघातील डोकारे आदिवासी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत व त्यांचे सुपुत्र व नवापूर तालुक्यातील युवकांचे आयकॉन असलेले धनंजय भरत गावीत यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष व नवापूर माजी विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराळे, जयंत जाधव उपस्थित होते.