नंदुरबार l प्रतिनिधी-
तापी नदी कॅचमेंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीकाठच्या गागरिक व गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पावसामुळे हतनूर धरणातुन पाण्याचा विसर्ग असून धरणाचे १६ गेट १.५ मीटरने उघडले आहेत. ७०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. तसेच सकाळी ९.०० वाजता १८ गेट १.५ मीटरने उघडण्यात आले असुन ८०००० ते १००००० क्युसेक पाण्यााचा विसर्ग तापी नदी पात्रात हतनुर धरणाातुन सोडण्यात येणार आहे.
तसेच सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज मध्ये ४८००० क्युसेक पाण्यााचा येवा सुरु असुन सांरगखेडा बॅरजचे ४ गेट ३ मिटरने उघडले असुन ४५७६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे, प्रकाशा बॅरेजचे ५ गेट ३ मीटरने उघडले असुन ५०३५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक लक्षात घेता पुढील काही तासात सांरगखेडा व प्रकाशा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात येईल.
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्यामुळे तापी नदी काठावरील गांवाना याव्दारे सतर्कतेचा इशारा देण्याात येत आहे. तापी नदीकाठावरील नागरीकांनी आपले गुरे व प्राणी नदी काठावर सोडू नये तसेच पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी ठेवावे. नागरीकांनी तापी नदी काठाजवळ जावू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.