Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारताचा कोहिनूर हरपला, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन

team by team
October 10, 2024
in राष्ट्रीय
0
भारताचा कोहिनूर हरपला, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन

नंदुरबार l प्रतिनिधी-

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. टाटा सन्स या देशातील सर्वात मोठे व्यावसायिक ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशभरातील लोकांमध्ये रतन टाटा यांच्याबद्दल नितांत आदर होता.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने खूप उंची गाठली. रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 2012 पर्यंत ते या पदावर होते. त्यांनी 1996 मध्ये टाटा सर्व्हिसेस आणि 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांची स्थापना केली.

रतन टाटा, त्यांच्या सभ्य वर्तनासाठी ओळखले जाणारे, सध्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, ज्यात सर रतन टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट तसेच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट यांचा समावेश आहे.

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्त्वाचे म्हणजे तीन दिवसांपूर्वीही रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त होते. मात्र, रतन टाटा यांनी स्वत: सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला होता. ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशीरा त्यांचे निधान झालं.

पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये झाला. 1962 मध्ये ते टाटा समूहात रुजू झाले. 1991 मध्ये त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या देशातील दोन सर्वोच्च सन्मानांनी सन्मानित केले. राष्ट्र उभारणीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

काठीच्या दसरा उत्सवावर यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच, महिला-मुलींची छेडछाड अन् अवैध धंदे रडारवर

Next Post

राज्यातील 120 आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते भुमीपुजन व लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add