नंदुरबार l प्रतिनिधी
खोडाईमाता यात्रेत धारदार शस्त्र घेऊन फिरणारे इसमास पोलीसांनी ताब्यात घेतले असून सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
3 12 ऑक्टोंबर दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर येथे यात्रा आयोजित केली जात असते. सदर यात्रेच्या कालावधीत मंदिराचे परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात, 8 ऑक्टोंबर 2024 रोजी नंदुरबार शहरातील खोडाई माता यात्रेत एक काळा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पँट घातलेला एक इसम धारदार शस्त्र (चाकू) कमरेला लावून फिरत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी एक पथक तयार करुन मिळालेल्या माहितीचे आधारे कारवाई करणेकामी लागलीच रवाना झाले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने खोडाई माता यात्रेत जावून संशयीत इसमाचा शोध घेतला असता, मिळालेल्या गोपनीय बातमीमधील वर्णनासारखा एक संशयीत इसम यात्रेतील एका ऊंच पाळण्याजवळ दिसून आला, सदर इसमास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अविष्कार सुदाम पिंपळे, रा. आंबेडकर चौक, नंदुरबार असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक धारदार शस्त्र (चाकू) मिळून आले, म्हणुन त्याच्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 608/2024 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश मोरे, दादाभाई मासुळ, रमेश साळुंके, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, आनंदा मराठे यांनी केली आहे.