नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या दोन ऑक्टोबर पासून नवापूर तालुक्यातील खोकसा, धनभर्डी, नागझरी, कामोद, दापूर उची मोवली या गावांमध्ये रात्रीच्या वेळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहे. या संदर्भात नागरिकांनी तत्काळ तालुका प्रशासनाला माहिती देऊन कळविल्यानंतर तहसीलदार पोलीस प्रशासन तसेच काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची भेट घेतली. व या संदर्भात एक्सपर्ट टीम बोलवून तपासणी केली जाईल असे आश्वासन दिले.
मात्र अद्यापही प्रशासनाची एक्सपर्ट टीम पोहोचलेली नाही. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. चार तारखेच्या रात्री दहा वाजून 18 मिनिटांनी भूकंपाचा मोठा हादरा बसला या भूकंपाची नोंद गांधीनगर येथील केंद्रामध्ये नोंद देखील झाली नंदुरबार जिल्हा प्रशासनाने देखील या संदर्भात एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
परंतु ज्या गावांमध्ये भूकंपाचा हादरा बसत आहे त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात विशेष म्हणजे भूकंप केंद्रामध्ये ज्या गावाची नोंद झाली आहे ते गाव आहे मोठे कडवान परंतु मोठे कडवान या गावांमध्ये असा कोणताही भूकंपाचा हादरा बसलेला नाही किंवा आवाज देखील झालेला नाही अशी तिथल्या नागरिकांनी माहिती दिली.
खोकसा गावाच्या आसपास या भूकंपाचे हादरे बसत आहे परंतु भूकंप केंद्रामध्ये लोकेशन मात्र दुसऱ्याच गावाचे दिसत आहे त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे आणि हा कधी बंद होईल या ठिकाणी एखादी मोठी घटना होईल तेव्हा प्रशासन येईल का असा संतप्त सवाल भयभीत नागरिकांनी विचारला आहे.