Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगावात शिवसेना शिंदे गटाने फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

team by team
October 1, 2024
in राजकीय
0
धडगावात शिवसेना शिंदे गटाने फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

नंदुरबार l प्रतिनिधी

महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या विरोधकांना बंद करायच्या असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अशा प्रवृत्तींपासून जनतेने सावध रहावे. सर्वसामान्य जनतेच हे सरकार आहे. महायुती सरकारच्या कुठल्याही योजना बंद होणार नसून,येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच शिवसैनिकांनी लागावे असे आवाहन शिवसेनेचे नेते खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले.

 

आदिवासींच आरक्षण हटवण्यात येणार असल्याच्या अपप्रचार लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी केला. आदिवासींच्या आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही. विरोधकांचा अपप्रचाराला बळी न पडण्याचे आव्हान देखील खा.शिंदे त्यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडगाव येथे शिवसेना शिंदे गटाच्या मेळावा घेण्यात आला. त्या प्रसंगी खा.डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

 

वेळ कमी असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कामाला आतापासूनच शिवसैनिकांनी लागण्याचे आवाहन खा.श्रीकांत शिंदेंनी केल्याने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. या वेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले,महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत.

 

त्या विरोधकांना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. काँग्रेसने लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी पीआयएल न्यायालयात दाखल केला आहे. आमचे सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू असं काँग्रेसने न्यायालयात सांगितलं आहे. अशा प्रवृत्तींपासून जनतेनं सावध रहावं. ज्या महिलांनी जुलै नंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील त्यांच्या खात्यात आता थेट चार महिन्यांचे पैसे प्राप्त होतील. राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात योजनेच्या माध्यमातून पैसे टाकणारे हे पहिले सरकार आहे.

 

यावेळी जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, जि.प सदस्य विजय पराडके, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,अक्राणी पं.स उपसभापती भाईदास अत्रे,धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, नंदुरबार पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख विद्या वळवी,युवा सेना प्रमुख योगेश पाटील,कात्रीचे सरपंच संदीप वळवी, दिलवरसिंग पावरा,राकेश पावरा,फत्तेसिंग पावरा, रघु पावरा,रविंद्र,पराडके आदी उपस्थित होते.

 

विरोधकांवर विश्वास ठेवू नका

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी आदिवासी समुदायाला भडककावण्याचे काम केलं. आदिवासींच्या आरक्षण हटवण्यात येणार असल्याच्या अपप्रचार करण्यात आला. आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही. विरोधकांवर विश्वास ठेवू नका. आदिवासींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही. असे खा. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

 

— तर जिल्ह्यात फिरू देणार नाही

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करतांना पात्रता टीकाकारांनी ओळखावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा घणाघात शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अन् दोघा शिक्षकांसह पंटर अडकला जाळ्यात

Next Post

नंदुरबार नगरपालिका विभागात अव्वल, माझी वसुंधरा अभियानात दीड कोटींचे बक्षीस जाहीर

Next Post
नंदुरबार नगरपालिका विभागात अव्वल, माझी वसुंधरा अभियानात दीड कोटींचे बक्षीस जाहीर

नंदुरबार नगरपालिका विभागात अव्वल, माझी वसुंधरा अभियानात दीड कोटींचे बक्षीस जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add