नंदुरबार l प्रतिनिधी-
देशाची राजधानी नवी दिल्लीत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी PESA च्या एक दिवसीय कॉन्फरन्स ला भेट दिली आणि आपलं मनोगत व्यक्त केलं, देशातील आकांक्षित जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या समाविष्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहे.
नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असतात तर केंद्र सरकारकडून नंदुरबार जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक योजना प्रभावीपणे या राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील लोकांना हेच अंतर्गत आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने वनपट्टेधारकांना विहीर, कृषी पंप, शेतीत वापरण्यात येणारे अवजाऱ्या, अशा महत्त्वाच्या वस्तू दिल्या जात आहे.
त्यासोबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावं यासाठी देखील भर दिली जात आहे. तर ग्रामपंचायतीकडून ठराव देऊन शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी एका बांबूच्या रोपाला सत्तर रुपये राज्य सरकार देत आहे. एवढेच नव्हे तर बांबू विक्रीसाठी देखील शासन मदत करणार आहे. त्यामुळे यात सर्वात महत्त्वाची भूमिका जिल्हा परिषद बजावते आहे.
त्यासोबत लखपती किसान ही योजना केंद्र सरकार राबवत असून, या योजनेला देखील पाठबळ देण्याचे काम नंदुरबार जिल्हा परिषद करत आहे. लखपती किसान या योजनेत शेतकऱ्यांना दहा बकऱ्या आणि एक बोकड यांच्या वाटप केलं जात आहे. बचत गट च्या महिलांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यासाठी बचत गटाच्या महिलांना सोलर ड्रायर दिला आहे. आमचूर पावडर तयार करण्यासाठी मशीन दिले आहेत.