नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ परिसरातील फलाई येथे ५६ गाव पाड्यांमध्ये वीज पोहचनार असू. ३७ कोटींच्या खर्चाच्या विद्युती कारणाचा कामांचा शुभारंभ खासदार अड.गोवाल पाडवी आणि माजी मंत्री आमदार के. सी.पाडवी यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा अतिदुर्गम भागात असणाऱ्या तोरणमाळ च्या खालच्या भागात असलेल्या झापी, खडकी ,उड्या, भादल ,फलाई यासह ५६ गाव पाड्यांमध्ये स्वातंत्र्या नंतर ७५ वर्षांनी वीज पोचणार आहे या साठी धडगाव अक्कलकुवा मतदार संघाचे आमदार के .सी.पाडवी यांच्या हस्ते ३७ कोटी रुपयांच्या विद्युती करण करण्यासाठी मंजूर झाले आसून या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यकर्माच्या अध्यक्ष स्थानी खासदार गोवाल पाडवी हे होते.