नंदुरबार l प्रतिनिधी-
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या नागसर (ता. नंदुरबार) येथील ४२ वर्षीय युवकाचा विरचक धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना दि. १२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
नागसर युवकांनी गणपती मूर्तीचे विसर्जन विरचक धरणात केले. दरम्यान, राजू हिरालाल पवार (वय ४२) हे धरणाच्या बँक वॉटर मध्ये पोहत असताना खोल पाण्यात गेल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र मिळून आले नाहीत..
यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे हेकॉ.मुकेश ठाकरे, सहकारी व तरुणांच्या मदतीने शोध घेतला. दुसऱ्या दिवशी शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून पट्टीचे पोहणाऱ्यांची मदत घेण्यात आली. यावेळी धरणात त्यांचा मृतदेह आढळून आला. मयत राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्याला भाऊ विजय पवार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तपास आष्टे पोलीस दूरक्षेत्राचे हेकाँ.काशिनाथ साळवे करीत आहेत.