Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे घरफोडी प्रकरणी सहा विधी संघर्ष बालकांकडून मुद्देमाल हस्तगत

team by team
October 12, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बेडु गोविंद नगरात घरफोडीत ३ लाख १० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातुन सहा विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेवुन ८  हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत  केला आहे. शहराच्या मध्यवस्तीत झालेला घरफोडीचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणला.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बेडु गोविंद नगरात फिर्यादी केदारनाथ जयस्वाल यांच्या घरात घरफोडी झाल्याने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर घरफोडीत ३ लाख १० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला होता . याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन करुन गोपनिय बातमीदार सक्रीय केले . गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार पोनि कळमकर व पथकाने शहरातील माळीवाडा भिलाटीतुन २ विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे ४ साथिदारांसह गुन्हा केल्याचे मान्य केले , गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल त्यांचा एक साथीदाराचे घरी असल्याबाबत सांगितले . त्यानुसार विधी संघर्ष बालकाचे घरी जाऊन झडती घेतली असता त्याचे घरातुन मोठे पितळी पातेले , पितळी परात , पितळी मोठा करंडा ६५ ग्रॅम वजनाचे एक चांदीचे ब्रासलेट , १२ नग पांढर्‍या धातुच्या अंगठया १० ग्रॅम वजनाचा एक चांदीचा शिक्का त्यावर लक्ष्मीदेवीच चित्र ५ ग्रॅम वजनाची एक चांदीची अंगठी असा एकूण ८  हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . नमुद ६ विधी संघर्ष बालकांना मुद्देमालासह गुन्ह्याचे पुढील तपास कामी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे . सदरची कामगिरी ही  पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक  विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर पोहवा जितेंद्र तांबोळी , पोना राकेश वसावे , राकेश मोरे , पोशि अभय राजपुत , आनंदा मराठे यांचे पथकाने केली असून शहराच्या मध्यवस्तीत झालेला घरफोडीचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणल्याबद्दल  पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

अहमदाबाद ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करा, वारकरी संप्रदायाची मागणी

Next Post

मिशन कवच कुंडल’ मोहिम यशस्वी करण्यासाठी लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add