नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांत ४८० जणांवर कारवाई करून एक लाख ३१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आले.
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी वाहतूक शाखेला कारवाईचे आदेश देत रहदारीची शिस्त लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहरातील विविध चौक, रस्ते, शाळांचे आवार व मुख्य रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली.
त्यात वाहतकीच्या कोंडीला चालक, कागदपत्रे सोबत न बाळगणारे, ट्रीपल सीट, वाहन चालवितांना मोबाइलवर बोलणे, फॅन्सी नंबर प्लेट, विमा नसणे, अवैध प्रवासी वाहतूक व मोठा आवाज करणारे सायलेन्सर असलेल्या दुचाकी अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या. एकूण ४८० केसेसमध्ये एक लाख ३१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहनाचे कागदपत्र न बाळगणारे अशा एकूण १८२ दुचाकींचा त्यात समावेश आहे. संबंधित वाहन चालकांचे वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी संजय महाजन, पोलीस निरिक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवी करण्यात आली.