नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील पालिकेच्या हद्दीत रस्त्यावर असलेले खड्डे व रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे असंख्य अपघात झाले. शहरात सुमारे ४०० ते ५०० खड्डे आहेत यामुळे अनेकांना दुखापत झाली ही बाब लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना उबाठा पक्षामार्फत जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
येथील पालिकेचे मुख्याधिकारी यांना शिवसेना उबाठा पक्षामार्फत रस्त्यांवरील खड्ड्याबाबत निवेदन यापूर्वी देण्यात आले होते . 2 सप्टेंबर पर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर आज येथील जुनी नगरपालिका चौकात असलेल्या खड्ड्यात पूजन करून खड्डा मुक्त नंदुरबार शहर करण्यासाठी विधीवत पूजा करण्यात आली.
त्यासोबत खड्ड्यात वृक्ष लागवड करण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वारा बाहेर निदर्शने करून मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारण्यात आला व रस्त्यावरील खड्डे कधीपर्यंत बुजविण्यात येतील त्या संदर्भात लेखी आश्वासन द्यावे असे आंदोलकांनी सांगितले त्यावर मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी संबंधित कर्मचारी संपावर असल्याने सायंकाळपर्यंत आपल्याला लेखी पत्र देतो गणेशोत्सवाच्या आधी खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. मध्यंतरी पाऊस असल्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही. मात्र लवकरच खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.
सदर आंदोलनात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनाला उपस्थित होते.
नंदुरबार शहरात सुमारे ४०० ते ५०० खड्डे आहेत या ठिकाणी रोज लहान मोठे अपघात होवुन नुकसान होत आहे. तरीही नगर पालिका हे खड्डे बुजवत नाही किंवा काहीही एक कार्यवाही करित नाही. लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीची कामे आधी घ्यावी असे यावेळी आंदोलकांनी सांगितले. अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
निवेदनावर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी , जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी, शहर संघटक भक्तवत्सल सोनार, व महानगर प्रमुख इम्तियाज पटेल, युवा शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, उपतालुकाप्रमुख निंबा पाटील, भरत पाटील, उपतालुकाप्रमुख सुनील पवार, चारुलता माळी,
काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैशाली चौधरी, चेतना माळी, प्रतिभा धनगर, भुरा पवार , भरत मालचे, सुनील पवार, मखन मालचे, जितेंद्र भिल, आकाश भील, सुरेश भील, दीपक शेल्टे, प्रकाश मालचे, उत्तर महाराष्ट्र सचिव डि डि पवार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.