नंदुरबार l प्रतिनिधी-
विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिन्याचा कालावधी बाकी असला तरी विधानसभेसाठी इच्छुकांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नंदुरबार, नवापूर, शहादा -तळोदा ,अक्कलकुवा- धडगाव अशा नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभेत यावर्षी चुरस पाहायला मिळणार आहे.
नवापूर विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची खूप गर्दी असल्याने चुरस पाहायला मिळणार आहे. नवापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी समाजासाठी नेहमीच आवाज उठवणारे के.टी गावित यांची सुकन्या ज्योत्स्ना गावित यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या विधानसभेला भारतीय जनता पक्षातर्फे भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु या विधानसभेत ज्योस्तना गावित यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
सामाजिक कार्यकर्ते तथा आपल्या समाजसेवेने सर्वांना परिचित असलेले के टी गावित यांची ज्योत्स्ना गावित सुकन्या आहेत. के टी गावीत यांनी आपल्या समाजकार्याने संपूर्ण जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे .अशातच त्यांच्या सुकन्या यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली तर हे समाजाच्या विकासासाठी लाभदायक ठरेल परंतु अजून विधानसभेला दोन महिन्याचा कालावधी आहे.या दोन महिन्यात अनेक घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. परंतु ज्योत्स्ना गावित यांना भाजपा कडून उमेदवारी मिळण्याचे शक्यता अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.