नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना अत्यंत पारदर्शी असून, कुठेही चकरा मारण्याची किंवा एखाद्या मध्यस्थांची गरज नाही.राज्यभरात ‘आरोग्य वारी आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून 57 जणांना दीड कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी दिले.
राज्यभरात ‘आरोग्य वारी, आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी आमदार कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी उपस्थित होते.यावेळी उपक्रमाची माहिती देताना राऊत म्हणाले,सहायता निधीची माहिती लोकांपर्यंत दोन ते अडीच वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून 300 कोटींची मदत राज्यातील गरजू रुग्णांना करण्यात आलेली आहे. पैशांअभावी उपचारापासून एकही रुग्ण वंचित राहू नये ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. शासनाने जनतेसाठी अनेक आरोग्यदायी योजना राबविलेल्या आहेत.
ते पुढे म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ‘आरोग्य वारी आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सहाय्यता निधी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास त्याच्या लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणार. योजना अत्यंत पारदर्शी असून, कुठेही चकरा मारण्याची किंवा एखाद्या मध्यस्थांची गरज नाही.त्याच्या लाभ मोबाईलच्या माध्यमातून 8650567567 या टोल फ्री नंबरवर डायल केल्यास मिळू शकतो.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, सध्या युवकांमध्ये हृदयविकाराच्या झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे छत्रपती हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब’टाकण्यात येणार आहे. नवजात बालकांना वेळेचे उपचार मिळावे यासाठी पेटीचे देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.
.
पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू गिरासे
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी पप्पू गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी दिले.