नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर का.वि. प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व वृक्ष दिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व वृक्षदिंडीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन , संस्थेचे कार्याध्यक्ष विजय भास्करराव पाटील, एन.डी.नांद्रे, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी भ्रमणध्वनी वरून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
तसेच सचिव भिका पाटील, भालेर वि. का. सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, माधवपुरी गोसावी, शहाणाभाऊ धनगर, रमेश पाटील,सुनील पाटील,हिम्मतराव पाटील अभिमन पाटील,बी.के.पाटील, वासुदेव पाटील, सर्व सन्माननीय मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. व संजय महाजन यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष विजय पाटील यांनी केला.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार विद्यालयाच्या प्राचार्या सौ.विद्या चव्हाण यांनी केला या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना श्रवण दत्त एस यांनी समग्र शिक्षा या विषयावर चर्चा करून पर्यावरणाचा एक भाग म्हणून वृक्षांचे महत्त्व विशद केले व वृक्षारोपण करून वृक्षदिंडीचे पूजन करण्यात आले. वृक्षसंवर्धन व जतन करावे म्हणून प्रतिज्ञा घेण्यात आली व वृक्ष संवर्धनासाठी गावात जनजागृती करण्यात आली. पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी आदिवासी शिबली नृत्य सादर करण्यात आले. रॅली काढून विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयी घोषणा देऊन तसेच नृत्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली व तंबाखूमुक्त शाळा व गाव म्हणून शिवाजी चौकात अमली पदार्थांची होळी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.व्ही. ईशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.