नंदुरबार l प्रतिनिधी
भालेर येथील न.ता.वि. स.संचलित शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधन निमित्त विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचे विद्यालया अंतर्गत प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात दोन गट करण्यात आले. मोठ्या गटात ३५ विद्यार्थ्यांनी तर लहान गटात ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या राख्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शांताराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक आर एच बागुल, पर्यवेक्षक व्ही.जे. पाटील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित होते ,त्यांनी प्रदर्शनातील राख्यांची पाहणी केली.
प्रदर्शनाचे परिक्षक म्हणून एन .जी. पाटील व श्रीमती यु.के. वळवी यांनी काम पाहिले. मोठ्या गटात मानवी पंकज शिंदे प्रथम क्रमांक, भारतीय गणेश पाटील द्वितीय, नमिता निलेश पाटील तृतीय व शिवानी अशोक खडांजगे उत्तेजनार्थ. लहान गटात निकिता दिनेश मालचे प्रथम, देव गणेश पाटील द्वितीय, सविता पावबा तृतीय, दिव्य ज्ञानेश्वर पाटील व धीरज प्रवीण कदमबांडे यांना उत्तेजनार्थ विजेता विद्यार्थ्यांना शाळेमार्फत पुढील कार्यक्रमात बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.