Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या तीस लाडक्या बहीणींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

Mahesh Patil by Mahesh Patil
August 17, 2024
in राजकीय
0
नंदुरबारच्या तीस लाडक्या बहीणींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

नंदुरबार l प्रतिनिधी

 

आमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आमच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील आमची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या महिन्यांचे पैसे माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. मला अतिशय आनंद होतो आहे, त्याबद्दल शासनाचे आभारी आहोत, असे सांगताना या पैशातून बचत करून मुलांच्या शिक्षणासाठी त्या बचत झालेल्या पैशांचा उपयोग करू असे, वंदना दिनेश राजपूत (राकसवाडे) यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितले.

 

‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहिले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत. या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला

 

परवापासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

 

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

 

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्यापुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने 108 योजना सुरु केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

 

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज या योजनेच्या माध्यमातून बहिणींसोबत एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. सर्वसामान्य, दुर्बल, गरीब, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक – युवती, कामगार यांच्यासाठी सरकार शक्य ते सर्व करत आहे. या सर्वांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला की केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’च्या माध्यमातून बचतगट सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. पूर्वी बचत गटांसाठी असलेली कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख रुपयांपर्यंत केली आहे. आता त्यामध्ये 50 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, शैक्षणिक फीसाठी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मुलींना शिक्षणामध्ये 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

 

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, युवक – युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. याचा फायदा उद्योगांनाही होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहेत. त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी फायद्यातच आली आहे. याशिवाय वारकऱ्यांना शासन मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. फक्त रस्ते, पूल बांधणे, दळणवळणाची साधने उभारणे महत्त्वाचे नाही तर लोककल्याणकारी योजना राबवणेही महत्त्वाचे आहे. यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यातील प्रत्येक घटकासाठी शासन योजना राबवित आहे.

 

शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बील माफ करण्यात आले आहे. 45 लाख कृषिपंप धारकांना याचा लाभ झाला आहे. तसेच नमो सन्मान योजनेमध्ये केंद्राच्या 6 हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासनाचे 6 हजार रुपये आणखी भर घालून आता 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

 

एखादी योजना सुरु करणे सोपे काम नाही. तसेच ती एका दिवसातही तयार होत नाही. लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम 1 वर्षापासून सुरु होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव यांच्या परिश्रमामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यापर्यंत योजना पोहोचवल्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचे मी अभिनंदन करतो.

 

महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

 

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

 

बातमी शेअर करा
Previous Post

704 कोटी रूपए खर्चाच्या 902 कामांना दिली मंजूरी, जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

गौरी- गणपती निमित्त देणार “आनंदाचा शिधा” : जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

Next Post
गौरी- गणपती निमित्त देणार “आनंदाचा शिधा” : जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

गौरी- गणपती निमित्त देणार "आनंदाचा शिधा" : जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

May 30, 2025
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

May 30, 2025
तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

May 30, 2025
भांडे संच वाटपाचा पुन्हा धडाका सुरू; माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाला शुभारंभ

भांडे संच वाटपाचा पुन्हा धडाका सुरू; माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाला शुभारंभ

May 25, 2025
घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यास संदर्भातील पत्राचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यास संदर्भातील पत्राचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

May 25, 2025
युवकाचा मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या एकास पाच वर्ष सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वीस वर्ष कारावासाची शिक्षा

May 24, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group