Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्व सुविधांनी सज्ज तालुका क्रीडा संकुल उभारणीला महिन्याअखेरीस होणार सुरुवात : मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित

team by team
August 17, 2024
in राजकीय
0
सर्व सुविधांनी सज्ज तालुका क्रीडा संकुल उभारणीला महिन्याअखेरीस होणार सुरुवात : मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हाभरातील क्रीडापटूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि सोयीचे व्हावे म्हणून नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाणी टेनिस हॉकी आणि तत्सम सर्व क्रीडा संबंधित सोयीसुविधांनी सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल निर्माण केले जात असून या महिन्या अखेरपर्यंत त्याचे भूमिपूजन केले जाईल व उभारणीला त्वरित सुरुवात केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी  दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी नंदुरबार येथे दिली.

 

युवकांना प्रोत्साहन मिळावे तसेच क्रीडा क्षेत्रातील आवड निर्माण व्हावी यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉ विजयकुमार गावित मित्र मंडळ व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून आज नंदुरबार शहरात विभागीय दोरी स्पर्धा व धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ.हिना गावित, आदिवासी विकास विभागाचे स्वीय सचिव विलास सवडे, मुंबई येथील कार्यकारी अधिकारी केंद्रे, रवी दांडगे, नानोटे, नगरसेवक संतोष वसईकर, लक्ष्मण माळी क्रीडा संघटनेचे ईश्वर धामणे, प्राध्यापक निकम व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

 

 

या कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंचे डॉ.विजयकुमार गावित व माजी खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की युवकांना खेळात चांगली संधी मिळावी त्यांनी खेळात प्राविण्य मिळावे यासाठी अश्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून शरीर सुदृढ राहण्यासाठी मदत होते. दोरी उडी, धावणे अशा स्पर्धेमुळे जीवन सुदृढ राहते आणि जर शरीर नियोगी राहिले तर सर्व अडचणीवर मात करता येते. युवकांना भविष्यात चांगले प्लॅटफॉर्म मिळावे जेणेकरून खेळ या क्षेत्रात चांगले प्राविण्य मिळवता येईल.यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन सातत्याने करायला पाहिजे असे नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी बोलतांना सांगितले…

 

दरम्यान, दोरी उड्या क्रीडा संघटनेच्या वतीने कार्यक्रम स्थळी अत्यंत रंजक पद्धतीने दोरी उड्यांचे विविध प्रकार सादर करण्यात आले. तत्पूर्वी धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या.

सन्मानित खेळाडू असे:

पुरुष गट (सिनियर) १० कि. मी.
अंतिम निकाल
1) दिनेश सजन वसावे- चांदसैली धडगाव-प्रथम 5000
2) खुमानसिंग जोमा ठाकरे- खामला धडगाव-द्वितीय 3000
3) भगतसिंग रामसिंग वळवी- 384 असली धडगाव- तृतिय 2000

 

महिला (सिनियर) ६ कि.मी. अंतिम निकाल

१) आरती अर्जुन पावरा – अभय कॉलेज धुळे- प्रथम क्रमांक 5000
२) शेवंता तुळशीराम पावरा – एच आर पटेल शिरपूर- द्वितीय क्रमांक 3000
3) सुनिता भरत पावरा – आर.सी. पटेल – तृतिय क्रमांक 2000

 

मुली (ज्युनियर) ५ कि.मी.अंतिम निकाल

1) शकीला बाशा वसावे- एचआर, पटेल शिरपूर – प्रथम क्रमांक 5000 रु
२) प्रियंका फत्तेसिंग वसावे – अनु. आश्रम शाळा जळखे – द्वितीय क्रमांक 3000रु.
3) योगिता संजय वळवी-महाजन हाय. धुळे- तृत्तिय क्रमांक 2000 रु

 

मुले (ज्युनियर) गट -५ कि.मी. अंतिम निकाल

1) मोहित सोमा पावरा – पि.बी. हाय. शिरपूर – प्रथम क्रमांक 5000 २७.
२) शेखर शांताराम शिंदे – नूतन मराठा विश्या. – द्वितीय क्रमांथ 3000 २०
3) रोशन ओल्या राहसे – तलावडी – तृतिय क्रमांक 2000

बातमी शेअर करा
Previous Post

आमलाड येथील विद्या गौरव येथे स्वातंत्र्यदिन साजरा

Next Post

नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त केली वृक्ष लागवड आणि रक्तदान

Next Post
नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त केली वृक्ष लागवड आणि रक्तदान

नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त केली वृक्ष लागवड आणि रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add