नंदुरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित द फ्युचर स्टेप स्कूल भालेर येथे 77 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथमतः शाळेचे ध्वजारोहण शाळेचे सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र हरिभाऊ बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील व कार्याध्यक्ष विजय बोरसे, संचालिका सौ. कविता पाटील सचिव भिका पाटील विं . का. सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, संस्थेचे सर्व संचालक हितचिंतक भालेर,नगाव, तिसी. तसेच पंच कृषितील ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमांत भाषण व देशभक्ती पर नृत्य सादर करण्यात आले. त्यात नर्सरी क्लास पासून पहिली पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गुरू पौर्णिमे निमित्त श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील प्रथम ,द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मेडल देवून गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
क.पु.पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर पाटील कार्याध्यक्ष तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील, सचिव भिका पाटील तसेच फ्युचर्स स्टेप स्कूलचे ध्वजारोहण विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी रवींद्र हरिभाऊ बागुल यांनी केले.
विद्यालयाचे ध्वजारोहण परशराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी उपस्थित काकर्देचे सरपंच मनसेचे तालुका अध्यक्ष राकेश माळी, विठोबा सोपानदेव चव्हाण, भालेर, नगाव तिशी, होळ, वडवद येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भालेर वि. का. सो. नवनियुक्त चेअरमन संतोष पाटील यांचा सत्कार भास्करराव पाटील यांनी केला. पाचवी ते बारावीतील लोकशाही पद्धतीने निवडून आलेला विद्यार्थी विद्यालयाचा मुख्यमंत्री याचा सत्कार विजय पाटील यांनी केला
विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी आर एच बागुल यांचा सत्कार विजय पाटील यांनी केला फ्युचर स्टेप स्कूलचे विद्यार्थी, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन देशभक्तीपर गीते, लोकगीते, नृत्य, भाषण, सादर केली याप्रसंगी प्राचार्या सौ विद्या चव्हाण ,पर्यवेक्षक ए. व्ही.कुवर विद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही व्ही इसी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पी एस सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले