नंदुरबार l प्रतिनिधी
येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात आदिवासी दिवस साजरा करण्यात आला,
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वंदना वळवी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार,
डॉ. विभूती गावित सचिव आदिवासी क्रीडा युवक मंडळ नटावद हे प्रमुख अतिथी लाभले या वेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांच्या हस्ते,प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा,पर्यवेक्षक मीनल वळवी, सी.पी बोरसे, अरुण गर्गे, उर्मिला मोरे, ललिता पानपाटील, रिटा वळवी आदी उपस्थित होते, मनीष पाडवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रास्ताविक सादर केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. विभूती गावित व वंदना वळवी यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत मांडून विद्यार्थ्यांना आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस प्रज्ञा पावरा या विद्यार्थिनीने पावरी भाषेमध्ये तर अंजल वळवी हिने आदिवासी भाषेमध्ये आदिवासी दिवसाचे महत्त्व विशद केले,विद्यार्थ्यांनी फॅशन शो मध्ये आदिवासी संस्कृतीतील विविध वेशभूषा परिधान करीत सर्वांचे लक्ष वेधले, या अनुषंगाने आदिवासी संस्कृतीचे दागिने प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले, नृत्य स्पर्धेमधे पावरा, आदिवासी, कोकणी, मावची व इतर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले, ह्या गटात प्रथम क्रमांक इयत्ता आठवी ब व ड ह्या तुकडीनी मिळवला.
चित्रकले स्पर्धेमध्ये आदिवासी संस्कृतीवर आधारित वारली पेंटिंग एकाहून एक आकर्षक चित्र बनवून आणले यात कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रथम हर्षदा मेवालाल कोकणी ,द्वितीय करीना साहेबराव सोनवणे,तृतीय साक्षी रवींद्र भावसार तर महाविद्यालयामध्ये लहान गटामध्ये धृवेश सुनील पवार, मोठ्या गटामध्ये
प्रथम सोहम वळवी, द्वितीय अनिकेत गावित, तृतीय मनोरमा वीरसिंग वसावे ह्या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकविला.
निबंध स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना मला गर्व आहे आदिवासी असल्याचा,आदिवासी क्रांतिकारकांची माहिती, आदिवासी संस्कृती, होय मी स्वातंत्र्यानंतरचा आदिवासी बोलतोय,आदिवासी विकासातील अडथळे व उपायोजना, आदिवासी दिनाचे महत्त्व ह्या विषयांवर निबंध देण्यात आले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांनी छान निबंध लिहून आणले होते, यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक जानकी जयंत पाठक द्वितीय क्रमांक सुहाने गणपत पाडवी तृतीय क्रमांक श्याम शंकर रहासे तर महाविद्यालयामध्ये इयत्ता पाचवीच्या गटात रिया दिलीप वळवी, इयत्ता सहावीच्या गटात उन्नती महेंद्र पाटील इयत्ता सातवीच्या गटात अनु नरषा वळवी, साक्षी केशव पावरा या विद्यार्थ्यांनी यश मिळवले, या सर्व स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रायटिंग पॅड देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नूतन पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.