Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लागू होणारा प्रत्येक नवीन कायदा आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करणारा; आदिवासी विकास विभागाचे निर्णयही उत्थान करणारे : मंत्रि डॉक्टर विजयकुमार गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
August 9, 2024
in राजकीय
0
लागू होणारा प्रत्येक नवीन कायदा आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करणारा; आदिवासी विकास विभागाचे निर्णयही उत्थान करणारे : मंत्रि डॉक्टर विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

आज सादर होत असलेल्या पारंपारिक आदिवासी कला आणि क्रीडा प्रकार संपुष्टात येऊ पाहत आहेत त्याचे जतन व्हावे म्हणून पारंपारिक आदिवासी कला शालेय शिक्षणात लागू करण्यावर लवकरच निर्णय करू, अशी माहिती देतानाच आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, आदिवासींच्या हक्काचे रक्षण करतील, असेच नवे नवे कायदे सरकार सातत्याने लागू करीत आहे.

 

चुकीचा दिला गेलेला जातीचा दाखला पुनर्तपासणी करण्याचा अधिकार याच्यापूर्वी नव्हता ते अधिकार देणारा जात प्रमाणपत्र संबंधित कायदा अशाच प्रकारे आपण नुकताच लागू केला. तथापि आदिवासींचे आरक्षण हटवू शकणारा या जगामध्ये अजून जन्मला नाही, हे कायम लक्षात ठेवा आणि खोट्याच्या मागे कधी पळू नका; या शब्दात आवाहन केले.

 

ते आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित पारंपारिक शोभा यात्रेनंतर शहरातील शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉ. हिना गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नतीशा माथूर (तळोदा), चंद्रकांत पवार (नंदुरबार) तसेच राज्यभरातून, जिल्ह्यातून आलेल्या विविध नृत्य पथकांसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले, येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये आदिवासी शाळा आणि वसतिगृहांचे संपूर्ण डिजिटलायझेशन केले जाईल. कोणत्या शिक्षकाने काय शिकवले विद्यार्थ्यांनी काय जेवण केले यासारख्या सर्व गोष्टींवर कॅमेरा नजर ठेवणार असून ती यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. शिक्षणासाठी ज्या ज्या सोयी लागतील त्या शंभर टक्के उपलब्ध करून देणार आहे.

 

कारण आदिवासी मुलांचं शिक्षण दर्जेदार झालंच पाहिजे यावर माझा भर आहे. त्यासाठी आतापर्यंत दिले जाणारी 1500 ची रक्कम वाढवून 2200 केली. दिवसागणिक शिक्षण पद्धती बदलत असल्याने मुलांना शिकवणारे शिक्षक सुद्धा अपडेट झाले पाहिजे या हेतूने आश्रम शाळांमधून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची सुद्धा परीक्षा घेण्याची पद्धत आपण सुरू केली आहे. पाहिजे तितक्या शिक्षकांना पीएचडी करण्याची मुभा सुद्धा लागू करीत आहोत,

 

अशी माहिती देऊन मंत्री नामदार डॉक्टर गावित पुढे म्हणाले, पशुपालन कुक्कुटपालन शेती उत्पादन प्रक्रिया उद्योग यासाठी अर्थसहाय्य देऊन उद्योग करू पाहणाऱ्यांना आपण उभे करीत आहोत. शेवटी हा आदिवासी विकास विभाग तुम्हा सर्वांचा आहे. दुर्लक्षित घटक ताकदीने उभारा रहावा या हेतूने तुम्ही मागाल ते द्यायला आम्ही तयार आहोत, फक्त उचित तेवढे मागा; असेही नामदार डॉक्टर गावित म्हणाले.

 

महाराष्ट्रात 47 आदिवासी उपजाती आहेत. आपल्या बोली, पेहराव वेगवेगळे असले तरी आदिवासी बांधव म्हणून आपण एक आहोत. एक रहायला हवे. दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी बांधव व त्याच्या प्रथा, पंरपरा कुणालाही अवगत नव्हत्या परंतु आदिवासी विकास विभागाचा मंत्री या नात्याने मी क्रिडा स्पर्धा, जागतिक आदिवासी दिवस, जनजाती दिवस भव्य-दिव्य स्वरूपात आयोजित करून राज्याला या गौरवशाली परंपरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. जागतिक आदिवासी दिवस जगातिल समग्र आदिवासी बांधवांसाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस असतो.

 

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने योजनांचा प्रचार, प्रसार व्हावा व आदिवासी संस्कृती आणि मुल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी काल, आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले आहे. कारण आदिवासी बांधवांच्या कला व कौशल्याचे ब्रॅंडिंग दुसरेच करताना दिसत होते. यापुढे आमचा आदिवासी बांधव संवत:च्या कलेचे स्वत:च ब्रँडिंग करेल.

शिक्षणातून समृद्ध व्हा : डॉ. सुप्रिया गावित
या कार्यक्रमातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, शिक्षणातून समृद्ध होण्याची संधी आदिवासी विद्यार्थ्यांना लाभली आहे, या संधीचे सोने करून आपले, कुटुंबाचे आणि समुदायाचे नाव उंच करण्यासाठी अथक परिश्रम घ्यायला हवेत. आज डीबीटी च्या निर्माण होणाऱ्या 50 टक्के अडचणी दूर झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते विकासासह जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध पेयजलाची योजना हाती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या योजनांच्या लाभातून सर्वांनी जीवन समृद्ध करायला हवे.

 

आदिवासी बोली आणि संस्कृती टीकवायला हवी-डॉ. हिना गावित
जगभरातल्या बोली भाषा आज अस्तित्वाच्या शेवटच्या घटका मोजताहेत. अशा परिस्थितीत आदिवासी बोली टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मला मी आदिवासी असल्याचा अभिमान आहे. मला आदिवासी बोली बोलता येते याचाही अभिमान असून संसदेतील आदिवासी प्रतिनिधी म्हणून मला युनो मध्येही सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.

 

आज होणार मुख्य कार्यक्रम
आज ( 9 ऑगस्ट) रोजी जागतिक आदिवासी दिनाचा मुख्य कार्यक्रम तालुका क्रिडा संकुलात होणार आहे. यावेळी क्रांतिकारी आणि महापुरुषांना अभिवादन करण्याकरिता सभेचे आयोजन केलेले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित, खासदार अॅड. गोवाल पाडवी, विधानपरिषद सदस्य अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, आमशा पाडवी, सत्यजित तांबे, विधानसभा सदस्य अॅड. के सी. पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, माजी खासदार हिना गावीत, असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात पार पडली भव्य आदिवासी गौरव रॅली; तारपा वादनाचा मंत्री डॉ. गावित यांनी घेतला आनंद

Next Post

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची खासदार गोवाल पाडवी यांनी घेतली भेट, मतदार संघातील विविध समस्या संदर्भात केली चर्चा

Next Post
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची खासदार गोवाल पाडवी यांनी घेतली भेट, मतदार संघातील विविध समस्या संदर्भात केली चर्चा

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची खासदार गोवाल पाडवी यांनी घेतली भेट, मतदार संघातील विविध समस्या संदर्भात केली चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

June 21, 2025
जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

June 21, 2025
मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

June 21, 2025
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

June 17, 2025
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

June 17, 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

June 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group