नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲड.गोवाल पाडवी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची संसदेतील विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयात भेट घेतली.
या भेटीत देशात त ज्या ज्या आदिवासी बहुल भागात विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा केला जातो त्या भागात केंद्र सरकारने नऊ ऑगस्ट च्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी लोकसभेत करावी अशी विनंती खासदार पाडवी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे केली असून त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
खासदार गोवाल पाडवी यांनी या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील आदिवासी भागातील आदिवासींच्या विविध समस्यांवर देशाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली . आदिवासी भागातील समस्या सोडविण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडी काम करेल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे .